

Viral Video
Sakal
Viral Video: मुंबईत प्रत्येकाचे हक्काचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न आहे. पण मुंबईत हक्काचे घर सोडा भाड्याने राहणे देखील सर्वसामान्य लोकांना परवडणारे नसते. बीकेसी हा मुंबईतील सर्वात पॉश आणि महागडा परिसर मानला जातो. अनेक सेलिब्रेटी, राजकीय नेते मंडळी येथे राहतात. त्यामुळे या भागात घरांच्या भाड्याचे रेटही गगणाला भिडणारे आहेत. सध्या सोशल मिडियावर एका कंटेट क्रिएटर तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात ती राहत असलेल्या घराचे बाडे ऐकून नेटकरी हैराण झाले आहेत.