
नागपूरमध्ये मुलाने वृद्ध वडिलांना क्रूरपणे मारहाण केली.
आईने मेंदी काढताना मारहाणीकडे दुर्लक्ष केले.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Nagpur Viral Video : सामाजिक माध्यमांवर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याने संपूर्ण समाजाला हादरवून सोडले आहे. या दोन मिनिटांच्या व्हिडिओत एक मुलगा आपल्या वृद्ध वडिलांना क्रूरपणे मारहाण करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, याच वेळी त्याची आई शेजारी बसून निश्चिंतपणे मेंदी काढत आहे. ही घटना नागपूरमधील शांतीनगर परिसरातील असल्याचे समोर आले आहे. या व्हिडिओने समाजात संतापाची लाट पसरली असून, मानवी मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.