Success Story : मुलीची पुस्तके चोरून वाचायची आई, ४९ वर्षी क्रॅक केली NEET; आता दोघीही होणार डॉक्टर

NEET success story : तामिळनाडूतील ४९ वर्षीय अमुथवल्ली मणिवन्नन यांनी त्यांच्या मुलीसोबत NEET परीक्षा उत्तीर्ण केली. अमुथवल्ली व्यवसायाने फिजिओथेरपिस्ट असून त्यांचे शालेय जीवनातील डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते.
49-year-old Amuthavalli from Tamil Nadu celebrates NEET success with her daughter, both now pursuing MBBS degrees in separate medical colleges.

49-year-old Amuthavalli from Tamil Nadu celebrates NEET success with her daughter, both now pursuing MBBS degrees in separate medical colleges.

esakal

Updated on

Summary

  1. कुटुंबाने त्यांना संपूर्ण साथ दिली, पती आणि मुलगी दोघेही तिच्या तयारीत सहभागी झाले.

  2. अमुथवल्लींना PWD कोट्यातून १४७ गुण मिळवत एमबीबीएस प्रवेश मिळाला.

  3. मुलगी संयुक्ताने ४५० गुण मिळवून स्वतंत्रपणे वेगळ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.

असं म्हणतात की पक्का निश्चय, धैर्य चिकाटी आणि कठोर मेहनत केली तर तुमचे स्वप्न पूर्ण करण्यापासून तु्म्हाला कोणीही रोखू शकत नाही. जेव्हा तुम्ही उंच भरारी घेण्याचा दृढनिश्चय करता तेव्हा वय देखील महत्त्वाचे नसते. तामिळनाडूतील तेनकासी जिल्ह्यातील ४९ वर्षीय अमुथवल्ली मणिवन्नन यांनी मात्र त्यांचे जिद्दी आणि चिकाटीच्या जोरावर अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करुन दाखवले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com