Viral Video: प्रेम म्हणजे आगीशी खेळ? धगधगत्या ज्वाळात नवरा नवरीचा रोमान्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

viral video

Viral Video: प्रेम म्हणजे आगीशी खेळ? धगधगत्या ज्वाळात नवरा नवरीचा रोमान्स

लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. सध्या असाच एक लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

या व्हिडीओत धगधगत्या आगीत नवरा नवरी डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा येणार. सध्या या जोडप्याचा रोमान्स चर्चेचा विषय ठरलाय. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. (newlywed couple bride groom dance romance in fire stunt video goes viral)

हेही वाचा: Viral Video : कार्याला सलाम! आत्महत्या करणाऱ्या महिलेला असे दिले जीवनदान

सदर व्हिडीओ तुम्हाला दिसेल की एक नवं जोडपं रोमँटीक डान्स करत आहे. पण या रोमँटीक डान्स सह या नवरा नवरीने एक खतरनाक स्टंटही केलाय. हे जोडपं डान्स करण्यात मग्न असतात. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे दोन मुलं जोडप्याच्या भोवती एक ज्वलनशील पदार्थ टाकतात आणि त्यानंतर आग लावतात. तरीसुद्धा हे जोडपं डान्स करताना दिसत आहे. धगधगत्या आगीत रोमान्समध्ये भान हरपलेल्या या जोडप्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतोय.

हेही वाचा: Photos: कोल्हापूरातील कोंबडीनं दिलं देशातील सर्वात मोठं अंडं

हा व्हिडीओ @edi_musaku या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ नेमका कुठलायं? याविषयी अद्याप माहिती मिळाली नाही. तरीसुद्धा या व्हिडीओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत तर लग्न खास बनविण्यासाठी असे काही स्टंट करायला नको, असे सुद्धा काही नेटीझन्सही खडसावले.