

एखाद्या मेळ्यात लोक हरवल्याचं आपण अनेकदा ऐकलं असेल पण मेळ्यात जर तरुणपणातील मित्रमैत्रिण भेटले ते ही तीस वर्षांनंतर... तर त्यांच्या काय भावना अन् काय प्रतिक्रिया असेल? क्षणभर आपण विचार करुयात. पण कुंभमेळ्यातील एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. यामध्ये अनेक वर्षांनंतर एका पोलीस अधिकाऱ्याला त्याच्या शाळेतील क्रश अचानक भेटली, विशेष म्हणजे ती एक प्रतिथयश शिक्षिका आहे. त्यांच्या या हृदयस्पर्शी भेटीचा व्हिडिओ बघण्यासारखा आहे.