Viral Video: अरेरे! जिममध्ये धक्का लागताच पेटलं पोरींचं भांडण; झिंज्या उपटत... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video: अरेरे! जिममध्ये धक्का लागताच पेटलं पोरींचं भांडण; झिंज्या उपटत...

Girls Viral Video: सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होतात. अलीकडेच जिममधील भांडणाऱ्या मुलींचा व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होतोय. मुलीचा मुलीला धक्का काय लागला आणि पोरींचं थेट भांडण पेटलं. हे भांडण एवढं तापलं की चक्क मुली मुलींच्या झिंज्या उपटायला लागल्या. त्यांच्या भांडणाचा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

हल्ली फिटनेससाठी अनेक तरूणी जिममध्ये जातात. मात्र जिममध्ये उपकरणे वापरताना काळजी बाळगावी लागते. अलीकडे एक घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती जिथे एका महिलेला स्मिथ मशीन या जिम उपकरणाचा वापर करत असताना दुसऱ्या तरूणीचा धक्का लागला. धक्का लागताच या तरूणींनी एकमेकींच्या झिंज्याच उपटायला सुरूवात केली.

हेही वाचा: Viral Video: बुटातून काढला भल्या मोठ्या सापानं फना अन्...; पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये काळं टीशर्ट घातलेली एक महिला स्मिथ मशीनवर तिचा सेट पूर्ण करत असताना वाट बघत असणारी दुसरी महिला घाईघाईत आत शिरते आणि तिला बाहेर ढकलताना दिसते. त्यानंतर जे घडतं त्याच कारणाने हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

महिलांच्या या भांडणाने नेटकऱ्यांचं चांगलंच लक्ष वेधून घेतलं आहे. हे भांडण सोडवायला गेलेल्या महिलांच्याही झिंज्या उपटताना महिला या व्हिडीओमध्ये दिसताय. अनेकांनी या व्हायरल व्हिडीओवर विनोदी कमेटं केल्या आहेत. एकाने तर भांडणात 'चागल्या कॅलरी बर्न झाल्या असतील' असे लिहीले तर दुसऱ्याने मुलींचे केस किती मजबूत आहेत हेही कळतंय असेही लिहीले आहे.