G20 Summit 2023: जगातल्या फक्त ३ लोकांना पासपोर्टशिवाय कोणत्याही देशामध्ये फिरता येतं; कोण आहेत हे? जाणून घ्या...

भारत पहिल्यांदाच जी २० शिखर परिषदेचं अध्यक्षपद भूषवत आहे. एका बाजूला व्हीव्हीआयपी पाहुण्यांना सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहे. पण दुसरीकडे या लोकांना भारताच्या नियमांनुसार, काही तपासण्याही कराव्या लागत आहे.
Passport News
Passport Newsesakal

भारताची राजधानी दिल्लीमध्ये सध्या जी २० शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. जगातल्या शक्तिशाली देशांमधले अति महत्त्वाचे नेते, अधिकारी या परिषदेसाठी दिल्लीमध्ये आले आहेत. दिल्लीचं रुपांतर आता सैन्याच्या छावणीमध्ये झालं आहे. संपूर्ण शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

भारत पहिल्यांदाच जी २० शिखर परिषदेचं अध्यक्षपद भूषवत आहे. एका बाजूला व्हीव्हीआयपी पाहुण्यांना सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जात आहे. पण दुसरीकडे या लोकांना भारताच्या नियमांनुसार, काही तपासण्याही कराव्या लागत आहे. सर्व व्हीव्हीआयपी लोकांकडे डिप्लोमॅट पासपोर्ट आहे, या पासपोर्टचं महत्त्व खूप जास्त आहे. असा डिप्लोमॅट पासपोर्ट असूनही राष्ट्राध्यक्षांना पासपोर्टची तपासणी आणि ठरलेल्या सर्व प्रक्रिया पार पाडाव्या लागत आहेत.

Passport News
G-20 Summit in Delhi: फुटबॉलची २६ स्टेडिअम्स मावतील एवढा भव्य आहे भारत मंडपम; जाणून घ्या याची वैशिष्ट्ये

डिप्लोमॅटिक पासपोर्ट म्हणजे काय, त्याचा फायदा काय?

डिप्लोमॅटिक पासपोर्ट देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना दिला जातो. डिप्लोमॅटिक पासपोर्ट धारकांना परदेशामध्ये काही विशेष सुविधा दिल्या जातात. हा पासपोर्ट ५ वर्षांमध्ये एक्स्पायर होतो. डिप्लोमॅटिक पासपोर्ट असणाऱ्या व्यक्तींना आंतरराष्ट्रीय सुविधा दिल्या जातात.

ज्या देशामध्ये असा पासपोर्ट असणाऱ्या व्यक्ती जातात, त्या देशातलं सरकार त्यांना अटक करू शकत नाही. अशा व्यक्ती बाहेरच्या देशात गेल्या असताना देशावर हल्ला झाला, तर सर्वात आधी या व्यक्तींना देशातून सुरक्षित बाहेर काढलं जातं. डिप्लोमॅटिक पासपोर्ट असलेल्या व्यक्तींना व्हिसाची गरज नसते. याशिवाय, विमानतळावर कोणत्याही प्रकारच्या रांगेमध्ये उभं राहावं लागत नाही.

जो बायडन यांच्याकडे आहे काळा पासपोर्ट

अमेरिकी राष्ट्रपती जो बायडन आणि त्यांच्या परिवारातल्या लोकांना तसंच अमेरिकेतल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना काळ्या रंगाचा पासपोर्ट देण्यात आला आहे. अमेरिकेमध्ये तीन वेगवेगळ्या रंगाचे पासपोर्ट दिले जातात. तीनही पासपोर्टचं वेगळं महत्त्व आहे.

कोणत्याही देशाचे राष्ट्राध्यक्ष आणि डिप्लोमॅटिक पासपोर्ट असलेले लोक विमानतळावर स्वतः रांगेत उभे राहत नाहीत. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासोबत त्यांचा स्टाफ असतो. या स्टाफचं काम राष्ट्राध्यक्षांची आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगणं आणि त्यांची तपासणी करून घेणं हे असतं. हे अधिकारी कागदपत्रे तपासून घेतात, राष्ट्राध्यक्ष सुरक्षा व्यवस्थेमध्ये पुढे निघून जातात.

Passport News
G-20 Summit in Delhi: इंदिरा गांधींच्या काळातही दिल्ली संमेलनासाठी सजली होती; पहिल्याच दिवशी मोठे नेते झाले नाराज

जगातल्या फक्त तीन लोकांना मिळाली आहे विशेष सुविधा

जगातल्या फक्त तीन लोकांना पासपोर्टशिवाय कोणत्याही देशामध्ये येण्याजाण्याची सुविधा मिळाली आहे. ब्रिटनचे राजा किंवा राणी संपूर्ण जगामध्ये कोणत्याही देशात येजा करू शकतात. यासाठी त्यांना पासपोर्ट दाखवण्याची गरज पडत नाही.

राणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सर्व देशांना संदेश पाठवले की आता चार्ल्स हे राजा आहेत. त्यामुळे ही डिप्लोमॅटिक इम्युनिटी किंग चार्ल्स यांना मिळावी. या मेसेजचा अर्थ असा की ज्या प्रमाणे राणीला पासपोर्ट दाखवण्याची गरज नव्हती, तसंच आता किंग चार्ल्स यांनाही पासपोर्ट दाखवण्याची गरज नाही. किंग चार्ल्स यांच्याशिवाय राजघराण्यातल्या इतर सदस्यांकडेही डिप्लोमॅटिक पासपोर्ट आहे.

जपानच्या राजा - राणीलाही पासपोर्ट दाखवण्याची गरज नाही

जपानमध्येही राजेशाही आहे. देशातली सगळी कामं राजा - राणीच्या नावाने चालवली जातात. २०१९ मध्ये नरोहितो आणि मसाको ओवादा यांना राजा - राणी बनवण्यात आलं. जपानमध्येही ब्रिटनसारखाच नियम आहे. ७० च्या दशकामध्ये जपानच्या संसदेने ठरवलं की ते आपल्या देशातल्या राजा - राणीला दुसऱ्या कोणत्याही देशात तपासणीला सामोरं जाऊ देणार नाही.

तेव्हापासून आजपर्यंत हा नियम पाळला जातो. दरवेळी जेव्हा या गादीवर कोणी नवीन राजा राणी येतात, तेव्हा जपानच्या परराष्ट्रय मंत्रालयाकडून सर्व देशांना संदेश पाठवला जातो. त्यानंतर जपानच्या राजा - राणीला पासपोर्टशिवाय फिरता येतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com