Viral Video: पाकिस्तानी तरूणी लता दीदींच्या प्रेमात; डान्सने जिंकली मनं, पाहा Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pakistani girl  dance on lata mangeshkar song video goes viral on internet

Viral Video: पाकिस्तानी तरूणी लता दीदींच्या प्रेमात; डान्सने जिंकली मनं, पाहा Video

सोशल मिडीयावर कधी कशाची चर्चा होईल सांगता येत नाही, दररोज असे कित्येक फोटो-व्हिडिओ व्हायरल होतं असतात. अलाच एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडिओची चर्चा होण्यामागे कारण देखील तेवढंच सुंदर आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ नेमकं आहे तरी काय? चला जाणून घेऊया..

तर हा व्हिडिओ पाकिस्तानचा असून या व्हिडिओमध्ये एक पाकिस्तानी मुलगी एका लग्नाच्या कार्यक्रमात संगीत सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या 'मेरा दिल ये पुकारे आजा...' या प्रसिद्ध गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. पाकिस्तानी तरुणीचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. युजर्सना डान्स स्टेप खूप पंसत केली जात आहे.

हेही वाचा - गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

हेही वाचा: Eknath Khadse News: मुलाची हत्या की आत्महत्या? गिरीश महाजनांचा खडसेंच्या वर्मावर घाव

हेही वाचा: Nitin Gadkari: कोश्यारींच्या वादग्रस्त विधानानंतर गडकरींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "आमच्या आई-वडिलांपेक्षा…"

या भन्नाट डान्स वर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहे. व्हिडीओमध्ये डान्स करणाऱ्या तरुणीचे नाव आयशा असल्याचं कळतंय. व्हिडीओ पाहून नेटकरी आयशाचं कौतुक करीत आहेत.