
Haryana Panipat School Boy Torture Hung Upside Down Renu madam case
esakal
पानिपतच्या शाळेत दुसरीतील विद्यार्थ्याला मारहाण करून उलटं लटकवण्याची क्रूर घटना घडली.
या घटनेमुळे शाळांमध्ये मुलांच्या सुरक्षेसाठी कडक कायद्यांची मागणी वाढली आहे.
या घटनेनंतर पुढे काय झाले, या केसमध्ये काय अपडेट आहे, जाणून घ्या
Panipat School Boy Beaten and Hung Upside Down : पानिपत हरियाणा येथील एका खासगी शाळेत दुसरीत शिकणाऱ्या सात वर्षीय विद्यार्थ्याला रक्त येईपर्यंत मारहाण करून त्याला उलटं लटकवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या शाळेतील दोन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले ज्यामुळे संतप्त पालक आणि कार्यकर्त्यांनी शाळेतील मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.