Viral Video : अ‍ॅम्ब्युलन्स मिळेना; पेशंटला थेट जेसीबीतून नेलं दवाखान्यात

Viral
Viral

भोपाळ : रूग्णांना वळेवर सुविधा न मिळाल्याने अनेक दुर्घटना घडल्याची माहिती आपल्याला असेल. त्याचबरोबर सुविधेच्या अभावामुळे अनेक रूग्णांचे हाल झाल्याचंही आपल्याला पाहायला मिळालं असेल. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून एका रूग्णाला वेळेवर अ‍ॅम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे जेसीबीमधून रूग्णालयात आणल्याचा प्रकार उघड झाला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ मध्यप्रदेशमधील असल्याचं समोर आलं आहे.

अधिक माहितीनुसार, एका तरूणाचा गाडीवरून जात असताना अपघात झाला होता. त्यानंतर अपघातस्थळी असलेल्या लोकांनी १०८ या नंबरवर कॉल केला होता पण वेळेवर अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध नसल्यामुळे जवळपास एक तासापासून तरूणाला जखमी अवस्थेत ताटकळत थांबावं लागलं होतं. त्यानंतर रस्त्याने जात असलेल्या जेसीबीत टाकून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

रूग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितलं की, "युवकाच्या दुचाकीचा अपघात झाला होता. त्यानंतर त्यांनी १०८ या क्रमांकावर संपर्क केला होता पण येथे अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध नव्हती. आम्ही दुसऱ्या अ‍ॅम्ब्युलन्ससाठी प्रस्ताव पाठवला आहे." असं वैद्यकीय अधिकारी प्रदिप मुधिया यांनी सांगितलं. दरम्यान, व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून ही व्हिडिओ प्रचंड शेअर केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com