

अनेकदा म्हटले जाते की पाळीव प्राणी संभाव्य धोका ओळखू शकतात आणि आपल्या मालकाचे व त्यांच्या कुटुंबाचे प्राण वाचवण्यासाठी निष्ठेपोटी स्वतःचा जीव देण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत. उत्तर प्रदेशातील बलिया येथून माणूस आणि प्राणी यांच्यातील अशाच एका बंधनाचे दर्शन घडवणारा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेने सर्वांचे डोळे पाणावले आहेत.