राष्ट्रगीत चालू असताना चाळे करणाऱ्या अदनानला यूपी पोलिसांनी उचललं; बाकीच्या मित्रांनाही...

राष्ट्रगीत सुरू असताना या तरूणाने डान्स केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
Viral Video
Viral VideoSakal

राष्ट्रगीत सुरू असताना सावधान अवस्थेत उभं राहण्याचं शिक्षण आपण लहानपणापासून घेत आलो आहोत. राष्ट्रगीत सुरू असताना कसलीच चुळबूळ करण्याची हिंमत आपली होत नसते. पण एका तरूणाने राष्ट्रगीत सुरू असताना चाळे करत चक्क डान्स केला आहे. या तरूणाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

अधिक माहितीनुसार, प्रजासत्ताक दिन हा देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तर प्रत्येक शाळेत आणि सरकारी कार्यालयात ध्वजारोहण केले जाते. यावेळी राष्ट्रगीतासाठी सर्वजण सावधान अवस्थेत उभे राहतात. पण एका तरूणाने राष्ट्रगीत सुरू असताना डान्स करून अपमान केल्याचं उघड झालं आहे. हा तरूण उत्तरप्रदेशातील मेरठ येथील असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन अदनान नाव असलेल्या आरोपीला अटक केली आहे. तर या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या इतर तरूणांचा शोध घेत असल्याची माहिती मेरठ पोलिसांनी दिली आहे. हा व्हिडिओ अनामिका जैन अंबर या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला सोशल मीडियावर साडेपाच लाख लोकांनी पाहिलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com