Trending News: मजुराच्या खात्यात अचानक आले २०० कोटी रूपये; सगळं घर हादरलं, सुरक्षेची केली मागणी

पण हा मजूर हे पैसे खर्च करू शकला नाही. पोलीस याच्या घरी पोहोचले आणि त्याची चौकशी करू लागले. यामुळे आता संपूर्ण घरामध्ये भीतीचं वातावरण आहे.
Trending News
Trending NewsSakal

हरियाणाच्या चरखी दादरी इथं एका मजुराच्या बँक खात्यामध्ये अचानक २०० कोटी रुपये आले आहेत. ही गोष्ट या मजुराला कळताच त्याला आश्चर्याचा धक्काच बसला आहे. त्याच्या घरचेही ही गोष्ट ऐकून आश्चर्यचकित झाले आहेत. त्यांना कोणालाच हे कळेना की एवढे पैसे बँक खात्यामध्ये आले तरी कुठून?

पण हा मजूर हे पैसे खर्च करू शकला नाही. पोलीस याच्या घरी पोहोचले आणि त्याची चौकशी करू लागले. यामुळे आता संपूर्ण घरामध्ये भीतीचं वातावरण आहे.

या मजुराचं नाव विक्रम असं आहे. एवढे पैसे खात्यामध्ये आल्याने सुरुवातीला त्याला आनंद झाला होता. मात्र आता त्याच्यासोबत त्याच्या घरचेही घाबरले आहेत. आजतकशी बोलताना विक्रम आणि त्याच्या घरच्यांनी सांगितलं की खात्यामध्ये इतके पैसे आल्याने ते अत्यंत भीतीच्या वातावरणामध्ये जगत आहे. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या सुरक्षेची मागणी केली आहे. (Trending News)

Trending News
Trending News: जगातला एक अजब परिवार; प्राण्याप्रमाणे चार पायांवर चालतात माणसं; काय आहे इथलं रहस्य?

एवढंच नव्हे तर विक्रमच्या नातेवाईकांनी उलट पोलिसांवरच आरोप केले आहेत. हे प्रकरण सोडवण्याऐवजी पोलिसांनी विक्रमच्या कुटुंबाला, त्यांची काहीच चूक नसताना धमकावल्याचा दावा त्यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन चौकशी केली. तसंच येस बँकेच्या खात्यामध्ये २०० कोटी रुपये आल्याच्या संदर्भातही तपासणी केली.

विक्रमच्या नातेवाईकांनी सांगितलं की, पोलिसांनी त्यांना सांगितलं की २०० कोटी रुपयांच्या प्रकरणी एक टीम बँकेत जाऊन बँक खात्याची तपासणी करेल. त्यानंतर तपासाच्या आधारे पुढची कारवाई केली जाईल. सध्या बँक खातं गोठवण्यात आलं आहे.

Trending News
Trending News: कोट्यधीशाची बायको असूनही करतेय नोकरी; महिलेचे खुलासे ऐकून हैराण व्हाल!

दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश पोलीस विक्रमच्या घरी गेले. तिथे जाऊन पोलिसांनी विक्रमला विचारलं की येस बँकेच्या खात्यामध्ये २०० कोटी रुपये आले आहेत. एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले? पोलिसांचं बोलणं ऐकून विक्रम आणि त्याच्या घरचे घाबरले. विक्रम दोन महिन्यांपूर्वी नोकरीसाठी पटौदी इथं गेला होता.

तिथे त्याने एक्सप्रेस २० या कंपनीमध्ये मजूर म्हणून काम सुरू केलं होतं. विक्रमचा भाऊ प्रदीप याच्या म्हणण्यानुसार, खातं सुरू करण्यासाठी विक्रमकडून त्याची कागदपत्रे मागवण्यात आली आणि नंतर त्याचं खातं रद्द झालं आहे, असं कारण देत त्याला नोकरीवरुन काढून टाकलं. विक्रमने १७ दिवस काम केलं होतं.

काहीतरी घोटाळा करण्यासाठी विक्रमच्या कागदपत्रांचा वापर करून बँक खातं सुरू केल्याची शंका पोलिसांना आली आहे. सध्या तपास सुरू आहे. पोलीस या प्रकरणी कोणतंही विधान करत नाहीयेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com