
Key Financial Habits That Enabled Early Retirement :एका भारतीय सर्वसामान्य व्यक्तीन वयाच्या ४५ वर्षापर्यंत सर्वसाधारण जीवन जगून आणि सतत बचत करून कशाप्रकारे साडेचार कोटींपेक्षाही जास्त रक्कम जमा केली, याबाबत माहिती देणारी एक रेडिएट पोस्ट सध्या चर्चेत आहे.
या पोस्टने वाचकांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका असा व्यक्ती ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा गलेलठ्ठ पगाराचा जॉब नव्हता किंवा कोणत्याही प्रकारे जादा कामही केले नाही, तरीही त्याने निमूटपणे आणि आपले काम चोखपणे करत वयाच्या ४५ व्या वर्षी निवृत्त होतेवेळी ४.७ कोटी रुपये जमावले आणि आपलं भविष्य सुखकर केलं.
ही पोस्ट एका रेडिएट युजरने शेअर केली आहे. ज्यात त्याने सांगितले आहे की, या पोस्टमधील व्यक्ती त्याचे काका आहेत. ज्यांनी साधे जीवन जगून वयाच्या ४५ वर्षी निवृत्त होईपर्यंत ४.७ कोटी रुपये जमवले. ते ३० वर्षे एकाच टू बीएचके फ्लॅटमध्ये राहिले. ते स्कूटर चालवायचे आणि क्वचितच एखाद्यावेळी सुट्टी घालवण्यासाठी बाहेर गेले असावेत. त्यांनी कोणताही व्यवसाय सुरू केला नाही, शेअर मार्केट, ट्रेडिंग केले नाही किंवा पैशाचे कोणतेही दिखावू कामही केले नाही. त्यांचे उत्पन्नाचे साधन म्हणजे केवळ त्यांचा कायमस्वरूपीचा नियमीत जॉब होते.
या पोस्टमध्ये सांगितले आहे की, त्यांना बचत करण्याची सवय होती. १९९८मध्ये त्यांनी म्युच्युअल फंडात दहा हजार रुपये जमा केले. त्यानंतर त्यांनी ५०० रुपयांची एसआयपी सुरू केली. प्रत्येकवेळी जेव्हा त्यांची पगार वाढ व्हायची तेव्हा ते ती रक्कम हजार, दोन हजार, पाच हजार अशी वाढवत गेले.
तसेच, पुढे या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जेव्हा ते निवृत्त झाले तेव्हा त्यांना मी विचारले की, तुम्ही हे कसं केलं?, तेव्हा त्यांनी त्यांचे पासबुक आणि CAMSमधून त्यांनी प्रिंट केलेली एक प्रत माझ्या हाती ठेवली अन् त्यांची एकूण जमा रक्कम होती ४.७ कोटी.
आता ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत असून यावर ९ हजारांहून अधिक लाईक्स आणि कमेंट्स देखील आल्या आहेत. एका एक्स युजरने शिस्त आणि दीर्घकालीन मानसिकेतेचे कौतुक केले आणि साध्या सवयींमुळे मोठे परिणाम कसे मिळू शकतात, याचं हे उदाहरण असल्याचे म्हटले. तर काहींना असेही वाटले की, तो व्यक्ती आयुष्यभर बचत करत राहिला, पण त्याने त्याच्या तरूणपणातील आयुष्याचा आनंदच घेतला नाही. अशाप्रकारे आथा या पोस्टवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.