
Prada Fashion Ramp: इटलीतील मिलान येथील प्राडा स्प्रिंग फॅशन शो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यामागचे कारण म्हणजे प्राडाने आपल्या सादरीकरणात जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पलसारखी दिसणाऱ्या सँडलचा समावेश केला. मॉडेल्सकडून सादर केलेली चप्पल ही कोल्हापुरी चप्पलेसारखीच असली तरी प्राडाने भारतीय कारागिरांना कोणतेही श्रेय दिले नाही. प्राडाने भारताच्या नावाचा उल्लेख का केला नाही, याबद्दल नाराजी पसरली आहे.