

A screenshot from Patna Marine Drive showing the moment when a pregnant woman and a traffic police officer engaged in a heated argument, leading to a viral video online.
esakal
Patna Marine Drive pregnant woman and traffic police Viral Video Incident : पाटणामधील मरीनड्राईव्ह (जेपीगंगा पथ) वर वाहतूक पोलिस आणि एका गर्भवती महिला यांच्यात झालेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित पोलिस कर्मचारी या प्रेग्नंट महिलेच्या थेट अंगावर स्कूटी नेताना दिसत आहे.
हा पोलिस कर्मचारी ज्यावेळी त्या महिलेच्या अंगावर स्कूटी नेत होता त्यावेळी ती महिला गाडी रोखण्याचा प्रयत्न करत त्याला ओरडून ओरडून म्हणत होती की, तुम्ही माझ्यासोबत असं कसं करू शकता? याचवेळी ती स्वत:ला वाचवण्याचाही प्रयत्न करत होती.
प्राप्त माहितीनुसार, ही प्रेग्नंट महिला आपल्या पतीसोबत सांयकाळी पाटणा येथील मरीनड्राइव्हवर फिरण्यास गेली होती. तेथून परत येताना त्यांना यूटर्न घ्यायचा होता, जो बराच दूर होता. त्यामुळे ते दोघे स्कूटीला ढकलत राँगसाइडने येत होते.
महिलेचा पती स्कूटीला धक्का देत होता. तेवढ्यात संबंधित पोलिस कर्मचारी तिथे आला आणि त्याने त्यांना अडवले. सर्वात आधी त्या पोलिसाने त्यांना राँगसाइड येत असल्याबाबत हटकले. यानंतर जेव्हा स्कूटीचा नंबर तपासला गेला तर त्या स्कूटीवर आधीचेही अनेक चलान थकीत होते. यानंतर पोलिस कर्मचाऱ्याने ती स्कूटी जप्त करावी लागेल असं सांगून, ती आपल्यासोबत नेण्याची तयारी केली.
यानंतर मग वादाला सुरुवात झाली. संबंधित महिला त्या पोलिस कर्मचाऱ्यास असे करण्यापासून विरोध करू लागली. तर पोलिस कर्मचारीही स्कूटी नेण्यावर ठाम होता. त्यामुळे तो स्कूटीवर बसला आणि त्याने स्कूटी सुरू केली. तेवढ्या त्या महिलने स्कूटीसमोर येत त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला न जुमानता तो स्कूटी चालवू लागला. तेव्हा मग ती महिला त्या पोलिस कर्मचाऱ्यास म्हणाली, की तुम्ही असं कसं करू शकता, माझ्या अंगावर स्कूटी घालू नका. मात्र त्या पोलिस कर्मचाऱ्याने स्कूटी पुढे नेणे सुरूच ठेवले. यामध्ये त्या महिलेच्या पोटाला स्कूटीचे समोरील बंपर लागल्याचेही समोर आले.
व्हिडिओत दिसत आहे की जवळपास २० मीटर त्या महिलेला स्कूटीसह ढकलत पुढे नेले गेले. जेव्हा महिला प्रचंड वेदना होवू लागल्या तेव्हा कुठे तो पोलिस कर्मचारी थांबला. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एवढंच नाहीतर या घटनेवरून आता बिहारमधील युवक काँग्रेसने राज्य सरकारवरही टीका सुरू केली आहे. शिवाय, पोलिस कर्मचाऱ्यावरही आरोप केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.