Viral Video
Viral VideoSakal

Viral Video : बाथरूममध्ये अंघोळीला गेला अन् दिसला महाकाय अजगर; थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

हा फोटो पाहून आपल्या अंगावर काटा येईल

साप किंवा अजगर हे नाव ऐकलं तरी आपल्या अंगावर काटा येतो. जर एखादा साप प्रत्यक्षात पाहिला तर आपली पळता भुई थोडी होते. पण आपल्या घरात एखादा महाकाय अजगर घुसला तर काय होईल? असा आपण विचारही करू शकत नाही. पण सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे.

Viral Video
Rebirth : धक्कादायक! "ही आज्जी नाही, माझी बायको आहे", 8 वर्षाच्या मुलाच्या पुनर्जन्माची कहाणी

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये बाथरूममध्ये एक भलामोठा अजगर बसलेला दिसत आहे. हा फोटो फेसबुकवर शेअर करण्यात आला असून एक व्यक्ती अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेल्यानंतर त्यांना हे थरारक चित्र दिसले आणि त्यांनी यासंबंधित सर्पमित्राला कळवले आणि अजगराला आपल्या घरातून बाहेर काढले.

दरम्यान, हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अजगराचे हे फोटो पाहून आपल्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. सोशल मीडियावरील अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com