Video Viral : वेगाने ट्रेन येत होती, तरूणीने गाडी आणली, रेल्वे ट्रॅकवर उभी केली अन् उतरून पळून गेली

हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही चांगलाच धक्का बसेल.
Viral Video
Viral VideoSakal

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक तरूणी रेल्वे ट्रॅकवर कार आणून उभी करते आणि उतरून पळून जाते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी चांगलाच शेअर केला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रेल्वे वेगाने येत असताना एक तरूणी कार घेऊन येते आणि रस्ता ओलांडावा की नाही या द्विधा अवस्थेत ती थांबते. ट्रेन अजून लांब आहे असं तिला वाटतं आणि ती गाडी अजून पुढे घेते. रेल्वे ट्रॅकवर गाडी गेल्यानंतर तिला ट्रेन जवळ आल्याचं दिसतं आणि ती गाडीतून उतरून पळून जाते.

Viral Video
Video : मुंबईत शेतमाल विक्रीस गेलेल्या मराठी तरूणाला स्थानिकांकडून त्रास; थेट राजू शेट्टींची वादात उडी

दरम्यान, गाडी ट्रॅकवर आडवी असल्यामुळे वेगात असलेली ट्रेन जवळ येऊन थांबलेली आहे. ट्रेन थांबल्यामुळे मोठा अपघात टळला आहे. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. द्विधा अवस्थेत या तरूणीने थेट रूळावरच गाडी नेऊन उभी केल्याचं पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com