
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी याबाबत माहिती देण्यासाठी शिवतीर्थावर पत्रकार परिषद घेतली. दरम्यान पत्रकार परिषद सुरु असताना सर्वांचे लक्ष वेधणार प्रसंग तिथे घडला. ज्याची चर्चा सुरु झाली. त्याचं झालं असं की राज ठाकरे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे देत असताना त्यांचा पाळीव श्वान रायनो तिथे पोहोचला. राज ठाकरेंनी त्याला प्रेमाने जवळ घेतले आणि कुरवाळले.