
Rangapanchami 2025: धुळवड आणि रंगपंचमीनिमित्त यंदा अनेक प्रकारच्या पिचकाऱ्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. या पिचकाऱ्यांच्या किंमती पाहिल्या तर हा आनंदाचा सण आहे की लुटीचा बाजार आहे, अशी प्रतिक्रिया सहज तुमच्या तोंडून निघू शकते. त्यात कहर म्हणजे यंदा या पिचकाऱ्यांच्या डिझाईन्स पाहिल्या तर तुमचा पारा चढल्याशिवाय राहणार नाही. कारण गुंड प्रवृत्तीचे लोक हिंसा करण्यासाठी जी हत्यारं वापरतात त्या हत्यारांच्या रुपातील या पिचकाऱ्या आहेत.