

Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Video
esakal
Viral Video : आज देशभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी हा महामानव अखेरचा श्वास घेतला त्या क्षणापासून ते आजपर्यंत लाखो-कोट्यवधी हृदयांमध्ये ते जिवंत आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा आणि समता-स्वातंत्र्य-बंधुता यांचा संदेश आजही समाजाला दिशा देत आहे.