Ratan Tata: रस्त्यावरच्या श्वानांना ताज हॉटेलात फ्री एंट्री; रतन टाटांच्या घरात देखील झोपण्याची खास सोय

Ratan Tata Taj Mahal Hotel: एका एचआरने अलीकडेच मुंबईतील ताजमहाल हॉटेलमध्ये मुक्काम केला आणि हॉटेलच्या प्रवेशद्वारावर एक श्वान शांतपणे झोपलेला पाहून आश्चर्य व्यक्त केले. श्वानाला पाहून रुबी खानने कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली.
Ratan Tata Taj Mahal Hotel
Ratan Tata Taj Mahal HotelSakal

Ratan Tata Taj Mahal Hotel: एका एचआरने अलीकडेच मुंबईतील ताजमहाल हॉटेलमध्ये मुक्काम केला आणि हॉटेलच्या प्रवेशद्वारावर एक श्वान शांतपणे झोपलेला पाहून आश्चर्य व्यक्त केले. श्वानाला पाहून रुबी खानने कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली. कर्मचाऱ्याने सांगितले की तो जन्मापासून हॉटेलचा एक भाग आहे. रतन टाटा यांनी हॉटेलच्या आवारात प्रवेश करणाऱ्या प्राण्यांशी चांगले वागण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत.

एका लिंक्डइन पोस्टमध्ये खान यांनी हॉटेलच्या मूल्यांची प्रशंसा केली. त्यांनी हॉटेल आणि त्याच्या मूल्यांचे कौतुक करताना लिहिले, "राजकीय नेते आणि सेलिब्रिटींसह अनेक पाहुण्यांचे आयोजन करणारे ताजमहाल हॉटेल, त्यांच्या परिसरातील प्रत्येक प्राण्याला महत्त्व देते. हॉटेलच्या प्रवेशद्वारावर झोपलेल्या श्वानाला पाहून मी खूप प्रभावित झाले. जे कदाचित अनेक पाहुण्यांच्या लक्षातही आले नसेल."

Ratan Tata Taj Mahal Hotel
EPFO: ईपीएफओने दिला कोट्यवधी ग्राहकांना दिलासा; क्लेम सेटलमेंटसाठी 'ही' कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत

खान यांनी त्यांचा अनुभव शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की व्यवसायाचा खरा आत्मा तेथील कर्मचारी इतरांशी कसे वागतात त्यावरून दिसून येतो. रुबी यांनी पुढे सांगितले की, त्यांनी ताजमहाल हॉटेलमध्ये ही तत्त्वे कृतीत आणताना पाहिली. खरी काळजी आणि प्रामाणिकतेसह व्यवसाय केल्याबद्दल त्यांनी हॉटेलचे कौतुक केले.

पोस्ट शेअर केल्यानंतर, प्रतिक्रिया आणि अनेक कमेंट्सचा पाऊस पडला. हॉटेलनेही या विषयावर भाष्य केले. ताज हॉटेल्सने खान यांच्या पोस्टवर टिप्पणी केली आणि लिहिले, "हाय रुबी, ही गोष्ट शेअर केल्याबद्दल धन्यवाद. ताजमध्ये, आम्ही सहानुभूतीला महत्त्व देतो.''

Ratan Tata Taj Mahal Hotel
RBI: आरबीआयने एडलवाईस ग्रुपवर केली मोठी कारवाई; समूहाच्या 2 कंपन्यांना ठोठावला दंड, काय आहे प्रकरण?

रतन टाटा यांना श्वानांची विशेष आवड आहे. एवढेच नाही तर मुंबईतील टाटा समूहाचे मुख्यालय असलेल्या बॉम्बे हाऊसमध्येही श्वानांसाठी खास जागा आहे. येथे भटक्या श्वानांना राहण्यासाठी जागा मिळते. रतन टाटा यांनी प्राण्यांसाठी हॉस्पिटल बांधण्याचा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता जो आता पूर्ण झाला आहे. त्यांना देशभरात श्वान रुग्णालये बांधायची आहेत आणि त्याची सुरुवात मुंबईपासून झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com