Ratan Tata: रतन टाटांचे वयाच्या 86व्या वर्षी स्वप्न होणार पूर्ण, वर्षानुवर्षे रखडलेला पेट प्रकल्प लागणार मार्गी

Ratan Tata: 2024 मध्ये, वयाच्या 86 व्या वर्षी, रतन टाटा यांचे जुने स्वप्न पूर्ण झाले आहे. हे ‘पेट’ प्रकल्पाचे स्वप्न आहे. मुंबईत मोठे पशुवैद्यकीय रुग्णालय बांधण्याचे त्यांचे स्वप्न होते, ते आता पूर्ण झाले आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला या रुग्णालयाचे काम सुरू होईल.
Ratan Tata finally completes his pet project, an animal hospital in Mumbai
Ratan Tata finally completes his pet project, an animal hospital in Mumbai Sakal

Ratan Tata: 2024 मध्ये, वयाच्या 86 व्या वर्षी, रतन टाटा यांचे जुने स्वप्न पूर्ण होणार आहे. हे स्वप्न ‘पेट’ प्रकल्पाचे आहे. मुंबईत मोठे पशुवैद्यकीय रुग्णालय बांधण्याचे रतन टाटा यांचे स्वप्न होते, ते आता पूर्ण होणार आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला या रुग्णालयाचे काम सुरू होईल. टाटा ट्रस्ट्स स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल असे या हॉस्पिटलचे नाव असणार आहे.

हे पशुवैद्यकीय रुग्णालय भारतातील सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक असेल. यापूर्वी टाटा ट्रस्टने भारतातील पहिले कॅन्सर केअर हॉस्पिटल टाटा मेमोरियल हॉस्पिटल, NCPA, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स-बेंगळुरू बांधले आहे.

रतन टाटा यांनी पशुवैद्यकीय रुग्णालय महालक्ष्मी येथे बांधले आहे. जे 2.2 एकर जागेवर आहे. ते बांधण्यासाठी 165 कोटी रुपये खर्च येणार असून या रुग्णालयात कुत्रा, मांजर, ससे या प्राण्यांवर उपचार केले जाणार आहेत. हे हॉस्पिटल 24×7 प्राण्यांवर उपचार सुरू ठेवेल.

Ratan Tata finally completes his pet project, an animal hospital in Mumbai
Gautam Adani: गौतम अदानींचे जोरदार कमबॅक, हिंडनबर्ग अहवालानंतर पुन्हा 100 अब्ज डॉलर क्लबमध्ये सामील

रुग्णालयाच्या उद्घाटनापूर्वी एका मुलाखतीत रतन टाटा यांनी सांगितले होते की, पाळीव प्राणी देखील अनेक लोकांच्या कुटुंबातील सदस्य असतात. अनेक पाळीव पालकांना या रुग्णालयाची गरज होती. हे रुग्णालय बांधण्याचे माझे स्वप्न होते. शहरांमध्ये अत्याधुनिक पशु आरोग्य केंद्रे असणे अत्यंत गरजेचे आहे. आता ते तयार होणार आहे, याचा मला खूप आनंद झाला आहे.

Ratan Tata finally completes his pet project, an animal hospital in Mumbai
PM Modi: डॉ. मनमोहन सिंग यांचं योगदान मोठं! मोदींनी केलं कौतुक, मार्गदर्शन करत राहण्याची केली विनंती

पशुवैद्यकीय रुग्णालय बांधण्यासाठी उशीर का झाला?

2017 मध्ये राज्य सरकारसोबतच्या करारानंतर कळंबोली, नवी मुंबई येथे सुरुवातीला रुग्णालय होणार होते. "ही जागा पाळीव प्राण्यांच्या पालकांसाठी, विशेषत: ज्यांना आपत्कालीन सेवांची गरज होती त्यांच्यासाठी हा एक मोठा अडथळा ठरू शकते.

हे लक्षात घेऊन, जमिनीसाठी योग्य जागा शोधणे आणि परवानग्या मिळवणे गरजेचे होते. त्यामुळे रुग्णालय बांधण्यासाठी उशीर झाला," असे रतन टाटा यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com