
Rajapur Incident: रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर इथं काल शिमग्याच्या उत्सवानिमित्त एक घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, यानंतर यावर उलट सुलट प्रतिक्रिया यायला लागल्या. आज दिवसभर मराठी तसेच राष्ट्रीय माध्यमांमध्ये या घटनेची जोरदार चर्चा सुरु होती. पण १२ मार्च २०२५ रोजी रात्री राजापुरात नेमकं काय घडलं? माडाची मिरवणूक नेमकी काय असते? या प्रकरणाला धार्मिक वळणं का मिळालं? या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात.