Snake Found Inside Shirt : शर्टमध्ये घुसला कोब्रा! बोलतीच बंद; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

Snake Found Inside Shirt Video: एखाद्या व्यक्तीच्या शर्टमध्ये जर साप घुसला तर काय होईल? याचा कधी विचार केलाय?
VSnake Found Inside Shirt viral Video
VSnake Found Inside Shirt viral VideoSakal

Snake Found Inside Shirt Video: साप किंवा अजगर पाहिला की प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो. सरपटणाऱ्या प्राण्यांची अनेकांना भिती वाटत असते किंवा अनेकदा कोब्राच्या हल्ल्यामध्ये कित्येक लोकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. पण एखाद्या व्यक्तीच्या शर्टमध्ये जर साप घुसला तर काय होईल?

फक्त हा विचार करून आपला थरकाप उडेल पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या शर्टमध्ये खरोखर कोब्रा घुसल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती झाडाखाली बसल्याचं दिसत आहे. तर झाडाच्या आजूबाजूला गवत आणि झुडपे आहेत. पण अचानक या व्यक्तीच्या शर्टमध्ये कोब्रा घुसल्याचं त्याला जाणवतं. त्यानंतर काही व्यक्ती या तरूणाच्या शर्टचे बटण उघडून या सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तर ज्या व्यक्तीच्या शर्टमध्ये साप घुसला आहे तो पुरता घाबरून गेला असून बऱ्याच प्रयत्नानंतर कोब्रा बाहेर आल्याचं दिसत आहे.

VSnake Found Inside Shirt viral Video
Viral Video : "नवरीच्या सौंदर्यावर नेटकरी भाळले पण.." चेहरा अन् व्हिडिओ पाहून भुरळून जाऊ नका

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. तर नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केलेल्या कमेंट वाचून आपल्यालाही हसू आवरणार नाही. तर हा थरकाप उडवणारा व्हिडिओ पाहून आपल्यालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com