

Unexpected Snake Bite During Russian Dancer's Performance : तरुण-तरुणीच्या स्टंटचे व्हिडीओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होतात. हे व्हिडीओ बघून अनेकदा आपल्याला थक्क व्हायला होतं. अशाच एका स्टंटचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत तरुणी साप हातात घेऊन डान्स करताना दिसून येते आहे. मात्र, या सापाने थेट तरुणीच्या नाकाचा चावा घेतला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.