

Samay Raina Shocks Fans With Deep Spiritual Thoughts on Ashtavakra Gita
Sakal
Samay Raina Osho video: मागच्या वर्षी फेब्रुवारी २०२५ मध्ये रणवीर अलाहाबादियाच्या अयोग्य प्रश्नामुळे समय रैना आणि त्याचा शो वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. मात्र आता नवीन व्हिडिओमार्फत कमबॅक करत समयने आपलं काम पुन्हा सुरु केलं आहे.
एवढंच नाही तर आता आणखी एका गोष्टीमुळे तो चर्चेेचा विषय बनला आहे. कारणही तसंच आहे. कॉमेडीच्या स्टेजवर सतत हसवणारा समय रैना “DostCast” पॉडकास्टमध्ये चक्क आध्यात्मिक विचारांवर दिसला आहे. या पॉडकास्टमध्ये त्याने ओशो (Osho) आणि अष्टवक्र गीता (Ashtavakra Gita) यावर मांडलेले विचार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. विनोदाच्या जगातून थेट आत्मशांती आणि जाणीवेच्या खोल विचारांकडे झालेला त्याचा हा प्रवास अनेकांना थक्क करून गेलाय.