Viral Video : विद्यार्थ्याने शाळेत चोरून वडापाव खाल्ला; कॅमेऱ्याकडे लक्ष गेलं अन्...

त्याचे हावभाव पाहून आपणही म्हणाल... "आयुष्यात एवढा कॉन्फिडन्स हवा..."
Viral Video
Viral Video Sakal

आपण लहानपणी शाळेत अनेकदा वेगवेगळे प्रयोग केले असतील. लहानपणी शाळेत वर्गात शिक्षक शिकवत असताना आपण अनेकांनी डब्बे खाल्ल्याच्या आठवणी असतील. सध्या अशाच एका विद्यार्थ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याने आपल्या दप्तरातून काढून चोरून वडापाव खाल्ल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.

Viral Video
तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सदर विद्यार्थ्याच्या बाजूला मुले बसलेली दिसत आहेत. एक विद्यार्थी आपल्या दप्तरातून वडापाव काढून खाताना दिसत आहे. तर त्यानंतर त्याचे लक्ष कॅमेऱ्याकडे जाते आणि तो कॅमेऱ्यात पाहून जे हावभाव करतो ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या मुलाचा कॉन्फिडन्स पाहून तुम्हीही म्हणाल... "आयुष्यात एवढा कॉन्फिडन्स हवा..."

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com