थंडीत लोक स्वतःला उबदार ठेवण्यासाठी स्वेटर आणि जॅकेट घालतात. बरेच लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांना किंवा भटक्या प्राण्यांना लोकरीचे कपडे घालतात. पण दक्षिण कोरियामध्ये एक अनोखी परंपरा पाळली जाते, ज्यामध्ये लोक झाडांना स्वेटर घालतात. सोशल मीडियात नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये सेऊल लोक हाताने विणलेले स्वेटर झाडांना घालताना दिसत आहेत. ही परंपरा रंजक तर आहेच पण त्यामागील कारण देखील तेवढेच हृदयस्पर्शी आहे.