

From Wipro IT Career to Organic Farming Entrepreneurship
esakal
Lessons for Young Entrepreneurs From Shashi Kumar’s Journey : बेंगळुरूतील शशी कुमार यांचा प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आयटी क्षेत्रातील स्थिर आणि चांगल्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी कृषी क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या या निर्णयाला कुटुंबाचा विरोध सहन करावा लागला. स्वतः शेतकरी असलेल्या त्यांच्या वडिलांना मुलाने शेतीऐवजी सुरक्षित नोकरी करावी, अशी अपेक्षा होती. त्यामुळे शशी कुमार यांच्या निर्णयामुळे वडिलांशी त्यांचे जवळपास आठ वर्षे बोलणे बंद झाले. तरीही त्यांनी आपले ध्येय सोडले नाही. आज त्यांनी स्थापन केलेली ‘अक्षयकल्प ऑरगॅनिक’ ही कंपनी सेंद्रिय दुग्धव्यवसाय क्षेत्रातील एक ओळखले जाणारे नाव बनली आहे.