
हरियाणाच्या नूह जिल्ह्यातून आई आणि मुलाच्या नात्याला कलंकित करणारा एक प्रकार समोर आला आहे. एका मुलगा त्याच्या ४० वर्षीय सावत्र आईसोबत पळून गेला.यानंतर दोघांनी कोर्ट मॅरेज केले. हे प्रकरण समोर येताच गावकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरु झाली. हतबल पित्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. प्रकरणाचा तपास सुरु आहे.