Shocking Video : 'मृत्यू फक्त 5 सेंटीमीटरवरून गेला...'; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

क्षणात काय काय होऊ शकतं हे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कळेल
Video Viral
Video ViralSakal

आपल्यासोबत कधी काय घडेल याचा काही नेम नाही. क्षणात एखादी चांगली घटना किंवा एखादी वाईट घटना सुद्धा घडू शकते. पण वाईट प्रसंग बेतल्यावर कोणत्या क्षणी काय होईल हे सांगता येत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक तरूण अपघातापासून थोडक्यात वाचला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा ट्वीटरवरून शेअर करण्यात आला असून त्यामध्ये एक तरूण स्केटिंग करताना दिसत आहे. पायऱ्याशेजारी असलेल्या लोखंडी पाईपवरून त्याने स्केटिंग करता करता थेट रस्त्यावर यशस्वीरित्या उडी मारली. त्यानंतर अचानक एक कार भरधाव वेगाने येते आणि तेवढ्यात तो थांबतो. त्याने खूप शिताफीने आपला वेग कमी केल्यामुळे हा अपघात झाला नाही.

Video Viral
"दोरखंड, विषाची बाटली येईल एवढा तरी द्या माझ्या बापाच्या कांद्याला दाम" कृषीकन्येचा कवितेतून आक्रोश |Video

पण हा व्हिडिओ पाहून आपला थरकाप उडेल. वेळेत या तरूणाने तत्परता दाखवली नसती तर हा अपघात झाला असता. पण फक्त पाच सेंटीमीटर अंतराने या तरूणाचा जीव वाचला आहे. सदर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com