Viral Video: काळ आला होता पण वेळ नाही! Video पाहून नशिबावर विश्वास ठेवाल

Viral Video
Viral VideoSakal

कधीकधी अशा घटना घडतात की त्या पाहून आपण आपल्या नशिबावर विश्वास ठेवू लागतो. अशा घटना खूप कमी वेळी आपल्या आयुष्यात येत असतात. मरण आपल्याला समोर दिसत असतं पण त्यातूनही आपण वाचतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा - योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी झोपलेली आपल्याला दिसत आहे. तेवढ्यात एक जंगली अस्वल तिच्याजवळ येते. त्यानंतर या मुलीने आपल्या डोळ्यावर हात ठेवून डोळे झाकून घेतले. अस्वलाने तिच्या जवळ येऊन तिचा वास घेतला आणि पुढे निघून गेले.

जर तिने काही हालचाल केली असती तर अस्वलाने आक्रमक होऊन तिच्यावर हल्ला केला असता. अस्वल हा आक्रमक आणि धोकादायक प्राणी असून ही मुलगी थोडक्यात बचावली आहे.

हा व्हिडिओ पाहून तुम्हीही असंच म्हणाल, काळ आला होता पण वेळ नाही...! हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com