

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचे लग्न पुढे ढकलल्यानंतर व्हायरल झालेल्या चॅट्सवर डी'कोस्टाने मोठा खुलासा केला.
esakal
Mary-dcosta Chat Clarification : इंटरनेटवर सध्या सांगलीची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न पुढे ढकलल्यानंतर अनेक अफवा उत आले आहे. दरम्यान मेरी डी'कोस्टा या मुलीमुळे हे लग्न थांबल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. पलाश मुच्छल आणि मेरी डी'कोस्टा यांच्यातील चॅट्सचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. डी'कोस्टाने हे चॅट्स रेडिटवर पोस्ट केले होते, अशी माहिती समोर आली. नंतर ते खाते बंद करण्यात आले, पण स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जोरदार चर्चा रंगली आहे.