
Viral : अन्न समजून नागाने गिळला प्लास्टिकचा पाईप; Video पाहून थक्क व्हाल
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे सध्या तरूणांचे मनोरंजनाचे साधन बनले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तरूणाईंचे मनोरंजन करत असतात. तर सध्या एका नागाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याने खाद्य समजून चक्क प्लास्टिकचा पाईप गिळला आहे.
हेही वाचा - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
साप पाहिला तर आपल्याला पळता भुई थोडी होते. पण सध्या एका सर्पमित्राने सापाच्या पोटातून चक्क प्लास्टिकचा पाईप काढला आहे. या नागाने खाद्य समजून प्लास्टिकचा पाईप गिळला होता. तर हा व्हिडिओ पाहून आपली झोप उडेल. या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून या व्हिडिओला लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.