Viral Video : बाप शेर तर पोरगं सव्वाशेर! आधी डोकं लावलं अन् नंतर चुना.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video Viral

Viral Video : बाप शेर तर पोरगं सव्वाशेर! आधी डोकं लावलं अन् नंतर चुना..

लहान मुले निरागस असतात. कधीकधी भल्याभल्यांना न जमणारे कामं लहान मुलांना जमतात. सध्या एका लहान मुलाचा आणि त्याच्या वडलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लहान मुलाने आपल्या वडिलांना डोकं चालवून चांगलच फसवलं आहे. हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लहान मुलगा आणि त्याचे वडील एक खेळ खेळत आहेत. एका काचेच्या बाटलीखाली नोट ठेवली असून ती जो व्यवस्थित काढेल त्याला ती नोट मिळेल असा खेळ असतो. ज्यावेळी वडील नोट काढतात त्यावेळी बाटली खाली पडते पण मुलाने डोकं चालवून बाटली पडू न देता नोट काढली आणि आपल्या वडिलांची फसवणूक केली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

टॅग्स :video viralfather and son