Cursed Airpor
esakal
Trending News
Video : शापित विमानतळ! तीन वर्षात पडलं बंद, आता पक्षीही फिरकत नाही; काय आहे रहस्य?
Spain’s Ciudad Real ‘Cursed Airport’ Mystery : २००९ मध्ये हे विमानतळ सुरु करण्यात आलं होतं. त्यावेळी ते भव्य स्वरुपाचं विमानतळ होतं. यासाठी एकूण ११ हजार ३८३ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, आता ते बंद पडलं आहे.
मागच्या काही वर्षात विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. त्यामुळे विमानतळं अपुरी पडू लागली आहे. मुंबईसारख्या शहरात आता दुसरं आंतरराष्ट्रीय विमानतळही तयार करण्यात येत आहे. या विमानतळावरून लवकरच उड्डाणं सुरु होणार आहेत. मात्र एक असं विमानतळ आहे, जे सुरु होताच तीन वर्षात बंद पडलं. हे विमानतळ युरोपमध्ये असून रियल सिउदाद एयरपोर्ट असं विमानतळाचं नाव आहे. या विमानतळाला आता ‘शापित विमानतळ’ म्हणून ओळखलं जातं आहे.
