Unusual Marriage Ritual : अजब प्रथा! लग्नावेळी घोडीवर बसण्याआधी नवरदेवाला आई करते स्तनपान

groom is breastfed by his mother : जाणून घ्या, भारतात नेमकी कुठं आहे ही अनोखी प्रथा आणि असं करण्यामागे नेमकं काय आहे कारण?
A rare traditional wedding ritual where the groom is breastfed by his mother before starting the marriage procession.

A rare traditional wedding ritual where the groom is breastfed by his mother before starting the marriage procession.

esakal

Updated on

Why the Groom Is Breastfed by His Mother Before Marriage : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. देशात अनेक धर्म, जाती, भाषा, संस्कृती, परंपरा आणि प्रथा आपल्याला दिसून येतात. भारतातील विविध राज्यांमधील विविध परंपरा देखील आपण पाहिल्या असतील. काही विचित्र परंपरा असतात तर काही अजब परंपरा पाहून आपल्याला धक्का बसतो. अशाच काहीशा अनोख्या प्रथेबाबत आपण माहिती घेणार आहोत. अर्थातच या प्रथेमागे खूप पूर्वापार चालत आलेली मान्यता आणि भावना आहे. 

या प्रथेनुसार, लग्नावेळी नवरदेव जेव्हा वरातीसाठी घोडीवर बसणार असतो, त्याआधी त्याला त्याची स्तनपान करते. ही प्रथा प्रामुख्याने राजस्थानमधील काही समुदायांमध्ये, हरियाणातील काही गावांत आणि पश्चिम नेपाळच्या काही भागात दिसून येते. प्रत्येक ठिकाणी याची पद्धती काहीशी वेगवेगळी आढळते. काही ठिकाणी प्रत्यक्षरित्या असे केले जात नाही, केवळ प्रतीकात्मरित्या ही प्रथा पाळली जाते.

या प्रथेमागेचा नेमका अर्थ काय? -

आई मुलाची पहिली गुरू आणि जीवन देणारी असते, पुर्वीकाळी लोक ही बाब अतिशय गांभीर्याने आणि भावनिकरित्या मानत होते. त्यावेळी लग्नावेळीची ही प्रथा या गोष्टीचा संकेत मानली जात होती की, हे आईकडून मुलाला दिले गेलेले शेवटचे पोषण आहे. लग्नानंतर मुलगा आपल्या नवीन आयुष्याकडे वळतो. त्यामुळे या प्रथेत एकप्रकारे निरोप देण्याची भावना देखील असते. याशिवाय, लग्नानंतरही आई आणि मुलाचे नाते दृढ राहते. पुर्वीकाळी समुदायाचे मानने होते की, पत्नी आल्यानंतरही आईचे प्रेम मुलाने विसरता कामानये. ही प्रथा त्याच भावनेचे प्रतीक आहे.

A rare traditional wedding ritual where the groom is breastfed by his mother before starting the marriage procession.
Hardik Pandya Sixes Video : हार्दिकने 'राउडी' स्टाइलमध्ये एकाच षटकात ठोकलेले दोन कडक ‘सिक्स’ पाहून ‘BCCI’पण प्रचंड खूश म्हटले...

पूर्वीच्या काळात  आईला मुलाची पहिली गुरू आणि जीवनदाता मानले जात असे आणि लोक याबाबत फार गंभीरही होते. त्यामुळे हा विवाह विधी पुढील काही गोष्टींचे प्रतीक मानला जात असे जसे की, १. आईने तिच्या मुलाला दिलेला हा "शेवटचा आहार" होता. लग्नानंतर, मुलगा त्याच्या नवीन आयुष्यात जातो  म्हणून हा विधीकडे निरोपाचा एक प्रकार म्हणून देखील पाहिले जायचे.

A rare traditional wedding ritual where the groom is breastfed by his mother before starting the marriage procession.
Donald Trump Special Comments Video : ‘’तो सुंदर चेहरा अन् मशीनगन सारखे ओठ…’’ ; ट्रम्प यांनी जाहीरपणे नेमकी कुणाची केली एवढी स्तुती?

२. यामुळे लग्नानंतरही आई-मुलाचे नाते तसेच मजबूत राहते. समाजाचा असा विश्वास होता की मुलाने आय़ुष्यात पत्नीच्या आगमनानंतरही आईचे प्रेम विसरता कामा नये. हा विधी त्याचेच प्रतीक आहे. तर पुर्वीकाळी कुटुंब मोठी होती आणि नात्यांची भूमिकाही निश्चित होती. यामुळे ही प्रथा आवश्यक मानली जायची.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com