Video Viral : पदवीप्रदान सोहळ्यात विद्यार्थ्याने फडकावला तिरंगा; अभिमानाचा क्षण

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Video Viral
Video Viral Sakal

उद्या भारताचा ७६ वा स्वातंत्र्यदिन असल्यामुळे संपूर्ण देश उत्साहात आहे. भारत सरकारने यानिमित्ताने "हर घर तिरंगा" आणि "तिरंगा रॅली"चे आयोजन केले आहे. प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकावणे आणि सरकारने जारी केलेल्या पोर्टलवर फोटो पोस्ट करण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक विद्यार्थी पदवी प्रदान सोहळ्यामध्ये भारताचा तिरंगा झेंडा फडकावताना दिसत आहे. विद्यार्थ्याच्या नावाची घोषणा झाल्यानंतर टाळ्याचा गडगडाट झाला आणि स्टेजवर गेल्यानंतर त्याने खिशातून तिरंगा झेंडा काढून फडकावला.

Video Viral
Police Dance Video : सुनो गौर से दुनियावालो! हातात तिरंगा घेऊन रस्त्यावर पोलिसाचा धडाकेबाज डान्स

दरम्यान, या विद्यार्थाने तिरंगा बाहेर काढताच तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तर ट्वीटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्याला पदवी मिळाली आणि त्याने लाखोंचे मने जिंकले असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com