Viral Video : मास्तरने दिला प्रश्न; विद्यार्थ्याने लिहिलं भन्नाट उत्तर, व्हिडिओ पाहून 'ते' दिवस आठवतील

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Viral Video
Viral VideoSakal

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण सध्या एका शाळेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका शिक्षकाने दिलेल्या प्रश्नावर विद्यार्थ्याने लिहिलेले उत्तर पाहून आपल्याला हसू आवरणार नाही. हा व्हिडिओ पाहून आपल्याला शाळेतील दिवस आठवतील.

Viral Video
Akshaya Tritiya 2023: उत्सव अक्षयदानाचा

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शिक्षकाने फळ्यावर एक प्रश्न लिहिला आहे. त्यामध्ये ∞ + ∞ = ? असा प्रश्न लिहिला आहे. त्यानंतर एका विद्यार्थ्याने पुढे येत त्याचे उत्तर 16 असे लिहिले आहे. पण हा आकडा आडवा लिहिला आहे. आडवं पाहिलं तर 8 + 8 = 16 असं दिसतं. पण सरळ पाहिल्यानंतर या प्रश्नाचा अर्थ वेगळा होतो. हा व्हिडिओ पाहून आपल्याला हसू आवरणार नाही.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर शेअर केला आहे. तर यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नेटकऱ्यांकडून या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचे साधन बनले असून यावर अनेक विनोदी, डान्स, सीसीटीव्ही, लग्न, युवक युवतीचे, जुगाडाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजन करतात तर काही व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जात असतात. व्हायरल होणारे व्हिडिओ पाहून किंवा इंस्टाग्रामवरील रील पाहून अनेकजणांचा दिवस आनंदात जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com