Pakistani Rapper Talha Anjum Stirs Controversy By Holding and Wearing The Indian Flag At A Kathmandu Concert
sakal
Pakistani Rapper Viral Video: भारत पाकिस्तान दुश्मनी फार जुनी आहे आणि या दुश्मनीमुळे दोन्ही देशात काही ना काही घटना घडतच असतात. अशीच एक घटना घडली असून सध्या सोशल मीडियावर तिने फार धुमाकूळ घातला आहे. नेपाळमधील काठमांडूमध्ये झालेल्या नुकत्याच एका कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी रॅपरने चक्क भारताचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून पाकिस्तानमध्ये त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे.