

भारतीय तरुणांमध्ये थार कारची खूपच क्रेझ आहे. थारचे अनेक स्टंटही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, पण हरियाणामध्ये एक अनोखी घटना घडली आहे, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.काही तरुण धावत्या थारच्या टपावर उभे राहून नाचत होते पण ट्रक खाली चिरडण्यापासून बचावले. काही सेकंदात त्यांचे प्राण वाचवल्याबद्दल ट्रक ड्रायव्हरचे कौतुक केले जात आहे.