Lucknow Robbery : चोरी करायला गेला अन्..एसीत झोपला ; लखनऊच्या चोराचा पराक्रम पाहिलात काय?

Thief Sleeping in AC : चोराने सांगितली सगळी कहाणी,अन्य चोरट्यांचा तपास सुरु
Thief's AC Nap Ends in Arrest Lucknow Police Catch Sleeping Burglar
Thief's AC Nap Ends in Arrest Lucknow Police Catch Sleeping Burglaresakal

Lucknow Robbery : चोरीच्या घटना दैनंदिन वाढत आहेत.अश्यातच लखनऊमध्ये झालेल्या एका चोरीने सगळे आश्चर्यचकित झाले आहेत.या चोरीमध्ये घडलं असं की चोराने त्या घरामध्ये चोरी केली.उन्हामुळे खूप गरम होत असल्याने तो त्या घरात एसी ऑन करून चक्क झोपी गेला.त्याला जाग आली ती थेट पोलीस आल्यानंतरच. तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे.

लखनऊच्या इंदिरा नगर भागात चोरट्यांनी घरात घुसून चोरीचा प्रयत्न केला. पण याच वेळी झालं असं काही की, चोरांच्या हिरोगिरीवर पाणी फिरलं. चोरीच्या नशेत असलेला एक चोर घरातल्या थंडगार एसीच्या झुळीत इतका गुंग झाला की, आपल्या सोबत्यांनाही विसरून गेला. बाकीचे चोर तर माल घेऊन पसार झाले पण हा महाशय एसीच्या थंडीत सुस्तावले.

Thief's AC Nap Ends in Arrest Lucknow Police Catch Sleeping Burglar
Cyber Crime : सायबर चोरट्यांचा धुमाकूळ! शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ६४ कोटींची फसवणूक

घराचे मालक हे सरकारी नोकर असून ते सध्या वाराणसीला असल्याची माहिती आहे. शेजारच्यांना सकाळी घराचे गेट उघडे असल्याचे लक्षात आले आणि घरात चोरी झाल्याची शंका येऊन त्यांनी पोलिसांना फोन केला.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर घरातून चोरी झाल्याची पुष्टी झाली. पण त्याचबरोबर त्यांना आणखी एक धक्कादायक दृश्य पहायला मिळाले. घरात एसीच्या थंडावर आरामशी झोपलेला एक चोर!

Thief's AC Nap Ends in Arrest Lucknow Police Catch Sleeping Burglar
Cyber Crime : डिजिटल अरेस्टचा धोका वाढतोय, स्वतःला कसे वाचवाल ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

पोलिसांनी त्याला जागेत केल्यावर तो चकित झाला. त्याने आपली सगळी कहाणी सांगितली आणि इतर साथीदारांना ओळख करून दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून उर्वरित चोरट्यांना पकडण्यासाठी तपास सुरू आहे. लवकरच इतर चोरट्यांना अटक करुन टोळीचा पर्दाफाश करू,असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

या चोरीच्या घटनेमुळे घरांमध्ये सुरक्षा व्यवस्था आणि जागरूक राहण्याचे महत्त्व अधोरेखित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com