

Snake Viral Video Rescue
esakal
Dangerous Snake Rescue : कोल्हापूर सीमाभागात एक धक्कादायक पण तितकाच रोमांचक प्रकार घडला आहे. मनोहर पाटील यांच्या मुर्ती बनवण्याच्या गोडावूनमध्ये एक, दोन नव्हे तर तब्बल तीन घोणस साप एकाचवेळी दिसल्याने कामगारांची मोठी धांदल उडाली. सध्या सापांचा मिलनकाळ सुरू असल्याने अनेकदा दोन–तीन साप एकत्र दिसतात; पण कामाच्या जागी तीन घोणस दिसल्याने सर्वच जण घाबरून गेले.