धक्कादायक! जंगल सफारीला गेलेली महिला खाली उतरली अन् वाघ घेऊन गेला | Video Viral

हा व्हिडिओ पाहून तुमचीही झोप उडेल.
Video Viral
Video ViralSakal

आपण कधी जंगल सफारीला गेलात का? जंगल सफारीला गेल्यावर जंगली प्राणी बघण्यासाठी आपण आतूर असतो. पण जंगली प्राणी दिसले नाही तर आपण नाराज होत असतो. सध्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये वाघाने तिच्यावर हल्ला केल्याचं दिसत आहे.

Video Viral
Akshaya Tritiya 2023: उत्सव अक्षयदानाचा

व्हायरल झालेला थरारक व्हिडिओ जंगल सफारी दरम्यानचा आहे. या व्हिडिओमध्ये तीन गाड्या रस्त्यावर थांबलेल्या आपल्याला दिसत आहेत. तर एका गाडीतून महिला खाली उतरते आणि दुसऱ्या बाजूला येते. तेवढ्यात एका वाघाने तिच्यावर हल्ला केला आणि तिला ओढून नेलं. या हल्ल्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, जंगल सफारीला गेल्यावर गाडीतून खाली उतरण्याची गरज काय आहे असा सवाल अनेक नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर वाघासाठी हा चांगला लंच झाला असल्याच्याही विनोदी कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत. पण जंगलात फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांनी आपली काळजी घ्यायला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com