Trending News: पृथ्वीवरुन डायनासोर कसे लुप्त झाले? अभ्यासातून समोर आलं कारण; मोठा खडक तुटला अन्...

लघुग्रहाची धडक की खडक फुटला? जाणून घ्या संशोधक काय सांगतात...
Dinosaur
DinosaurSakal

पृथ्वीवर डायनासोरच्या अस्तित्वाचे अनेक पुरावे सापडले आहेत. पण ते नामशेष कसे झाले याचं अचूक उत्तर कोणाकडेही नाही. दीर्घकाळापासून संशोधक सुचवत आहेत की लघुग्रह पृथ्वीला धडकला आणि त्यामुळे झालेल्या विध्वंसामुळे डायनासोरचा मृत्यू झाला असावा.

आता डायनासोर नामशेष होण्यासंदर्भात एक नवीन अभ्यास समोर आला आहे. या अभ्यासात असं सांगण्यात आलं आहे की सुमारे ६५ दशलक्ष वर्षांपूर्वी त्यांच्या नामशेष होण्यात खडकांच्या तुटण्याची महत्त्वाची भूमिका होती.

बेल्जियमच्या रॉयल ऑब्झर्व्हेटरीच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने केलेला नवीन अभ्यास सोमवारी प्रकाशित झाला आहे. या अभ्यासात माउंट एव्हरेस्टपेक्षा ११ पट उंच असलेला मोठा खडक तुटल्याने आणि त्याचा ढिगारा आणि धूळ यामुळे पृथ्वीच्या वातावरणात गडद अंधार झाल्याचं सांगण्यात आलं. ही धूळ आणि मलबा पृथ्वीच्या वातावरणात १५ वर्षे राहिला. खडकाचा ढिगारा सुमारे २,००० गिगाटन होता, ज्यामुळे सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचू शकला नाही आणि एक भिंत तयार झाली.

Dinosaur
Trending News: 'गणपती'ने वाचवलं; लाटांमुळे समुद्रात हरवला १३ वर्षांचा मुलगा; २४ तासांनी जिवंत सापडला तो असा...

शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की ही भिंत १५ वर्षे वातावरणात राहिली. पृथ्वीवर सूर्यप्रकाश पोहोचत नसल्यामुळे बराच काळ पृथ्वीवर थंडी पसरली ज्यामुळे अनेक झाडे आणि वनस्पती नष्ट झाल्या. त्याच्या प्रभावामुळे, पृथ्वीवरील सुमारे ७५ टक्के प्राणी १५ वर्षांत मरण पावले. (Trending News)

बेल्जियमच्या शास्त्रज्ञांना अमेरिकेतील नॉर्थ डकोटा इथल्या टॅनिस जीवाश्माच्या ठिकाणी आकाशात धुळीचे काही कण आढळून आले आहेत. जेव्हा या कणांनी वातावरणात भिंत तयार केली तेव्हा डायनासोर पृथ्वीवरून नामशेष झाले. संशोधकांनी सांगितलं की धुळीचे कण 8.0 मायक्रोमीटरचे होते.

Dinosaur
Buy A New Car : दिवाळीत नवी गाडी घ्यायचा अचानक प्लॅन झाला असेल तर काळजी करू नका, या गाड्यांची डिलिव्हरी लवकर मिळेल

पण दुसऱ्या एका अभ्यासात भूगर्भीय निर्मिती निष्कर्षापर्यंत पोहोचली की एका प्रचंड लघुग्रहाच्या धडकेमुळे डायनासोर पृथ्वीवरून नष्ट होण्याचे पुरेसे पुरावे नाहीत. पूर्वी असं म्हटलं जात होतं की एका मोठ्या लघुग्रहाच्या धडकेमुळे, जंगलातील आगीतून सल्फर आणि काजळी वातावरणात पसरली, ज्यामुळे पृथ्वी दीर्घकाळ थंडीत बुडाली. या परिणामामुळे डायनासोर नामशेष झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com