Trending News: चोर असला म्हणुनी काय जाहले...; हनुमान चालिसा म्हटली, दानपेटीत पैसे टाकले अन् पेटीच लुटली!

चोरीच्या या पद्धतीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Haryana Theft
Haryana TheftSakal

हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातून चोरीची एक विचित्र बातमी समोर येत आहे.  चोरट्यानं मंदिरात चोरी करण्यापूर्वी हनुमान चालिसा पठण केलं आणि दानपेटीत १० रुपयेही ठेवले. यानंतर त्याने दानपेटी फोडून रक्कम चोरून पळ काढला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रेवाडी जिल्ह्यातील धरुहेरा इथल्या विकास नगरमध्ये असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिरात चोरट्याने दानपेटी फोडून रोख रक्कम चोरून नेली. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, चोरीच्या या पद्धतीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Trending News)

Haryana Theft
Trending News: सुट्टी एन्जॉय करायला गेलेल्या जोडप्याला कॅब पडली महागात; बिल आलं २४ लाख

सीसीटीव्ही फुटेजनुसार, आरोपींनी मंदिरात बसून आधी हनुमान चालीसाचं पठण केलं. यानंतर १० रुपये दान म्हणून दिले. त्यानंतर तो मंदिरात एकटाच असताना मंदिरातली दानपेटी चोरतो आणि तिथून पळ काढतो. मंदिराच्या पुजाऱ्याच्या तक्रारीच्या आधारे सेक्टर-६ पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी चोरट्याने किती रक्कम चोरली हे स्पष्ट झालेलं नाही.

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, विकास नगरमधील पंचमुखी मंदिराचे पुजारी रामनिवास हातरसच्या विरा गावचे रहिवासी आहेत. त्यांनी सांगितलं की, ८ जुलै रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास ते मंदिराच्या आवारात काम करुन त्यांच्या खोलीकडे जात होते. रात्री साडे नऊ वाजता त्यांनी मंदिराचे दरवाजे बंद केले. दुसऱ्या दिवशी मंदिराचे दरवाजे उघडून साफसफाई केली असता दानपेटी तुटलेली दिसली, त्यानंतर ही बाब मंदिर समितीच्या सदस्यांना कळवण्यात आली.

Haryana Theft
Trending News : लाखो खर्च करून बसवले खोटे दात; सुंदर दिसण्याच्या नादात शार्कसारखा दिसू लागला तरुण

 मंदिर समितीच्या सदस्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास एक तरुण मंदिरात पूजा करण्यासाठी येत असल्याचं दिसून आलं. व्हिडिओमध्ये तो दानपेटीजवळ बसून पूजा करताना दिसत आहे. तो हनुमान चालिसाचे पठण करत असताना त्याच्या जवळ दुसरा भक्तही पूजा करताना दिसतो. त्यानंतर आरोपीनं पर्समधून पैसे काढून दानपेटीत टाकले. यानंतर त्याने जोरात धक्का देऊन दानपेटी फोडली. मग पैसे त्याच्या शर्टमध्ये ठेवले आणि तिथून निघून गेला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com