Bomb Video : विमानात बॉम्ब अन् अल्लाह हू अकबर म्हणत प्रवाशाने दिली धमकी; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

easyjet plane makes emergency landing after inflight bomb threat by passenger : ग्लासगोला जाणाऱ्या इझीजेट विमानात प्रवाशाने बॉम्बची धमकी दिल्यानंतर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
easyjet plane makes emergency landing after inflight bomb threat by passenger
easyjet plane makes emergency landing after inflight bomb threat by passengeresakal
Updated on
Summary
  • इझीजेट विमानात प्रवाशाने बॉम्ब असल्याचे सांगितल्यानंतर गोंधळ उडाला.

  • वैमानिकाने प्रसंगावधान राखून ग्लासगो येथे आपत्कालीन लँडिंग केले.

  • विमानातील या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे

UK Plane Bomb Threat Video : ल्युटनहून ग्लासगोच्या दिशेने जाणाऱ्या इझीजेट विमानात अचानक निर्माण झालेल्या गोंधळामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं. एका प्रवाशाने दिलेल्या धमकीमुळे विमानाचे तात्काळ ग्लासगो विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले.

ही घटना घडली तेव्हा विमान हवेत उड्डाण करत होते आणि अनेक प्रवासी आपल्या प्रवासात व्यस्त होते. याच दरम्यान, एका प्रवाशाने अचानक जोरजोरात “अल्लाहू अकबर, विमानात बॉम्ब आहे”, “अमेरिका मुर्दाबाद” आणि “ट्रम्प मुर्दाबाद” अशा घोषणा देताच संपूर्ण विमानात खळबळ उडली.

या व्यक्तीने वॉशरूममधून बाहेर येताच अशा प्रकारच्या घोषणा दिल्या आणि "मी हे विमान उडवून देईन" अशी धमकीही दिली. त्याच्या वर्तनामुळे इतर प्रवासी घाबरले व काही प्रवाशांनी मिळून त्याला ताब्यात घेतले. या घटनेमुळे विमानातील वातावरण क्षणात तणावपूर्ण बनले.

पायलटने तत्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क साधून विमानाच्या सुरक्षित लँडिंगची विनंती केली. त्यानुसार विमानाने ग्लासगो विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. लँडिंगनंतर सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण विमानाची तपासणी करण्यात आली. धमकी देणाऱ्या प्रवाशाला तत्काळ अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

सध्या जगभरात विमान प्रवासाशी संबंधित आपत्कालीन लँडिंगच्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहेत. फक्त जुलै महिन्यातच अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्या प्रवाशांच्या सुरक्षेविषयी गंभीर चिंता निर्माण करतात.

easyjet plane makes emergency landing after inflight bomb threat by passenger
Police Officer Video : वर्दीचा माज एकदम वाईट! चष्म्याच्या दुकानात जाऊन पोलिस अधिकाऱ्याने केलं धक्कादायक काम; व्हिडिओ फुटेज व्हायरल
  • २२ जुलैला तुर्कीहून एडिनबर्गकडे जाणाऱ्या इझीजेट फ्लाइट EZY3282 ला तांत्रिक बिघाडामुळे बल्गेरियातील सोफिया येथे उतरणं भाग पडलं.

  • २१ जुलैला कोचीहून मुंबईकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI-2744 विमानाने मुसळधार पावसामुळे धावपट्टीवरून घसरत अपघातजन्य लँडिंग केलं. या घटनेत विमानाचं इंजिन खराब झालं.

  • १६ जुलैला दिल्लीहून गोवाकडे जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E 2176 ला एका इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मुंबईत आपत्कालीन लँडिंग करावं लागलं.

  • ८ जुलैला ब्रिटनच्या F-35 B लढाऊ विमानाचे केरळमध्ये इंधन कमी झाल्यामुळे तिरुअनंतपुरम येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं.

easyjet plane makes emergency landing after inflight bomb threat by passenger
Jatayu Video : रामायणानंतर पहिल्यांदाच दिसले जिवंत जटायू? बघ्यांची गर्दी; आश्चर्यकारक पक्ष्याचा व्हिडिओ व्हायरल..

विमानात बॉम्ब असल्याची धमकी ही केवळ प्रवाशांमध्ये भीती पसरवणारी नसून, ती विमानतळ प्रशासन आणि सुरक्षाव्यवस्थेसमोरही मोठं आव्हान उभी करते. या घटनेनंतर विमान कंपन्या आणि सरकारकडून विमान सुरक्षेचे नियम अधिक कडक करण्यात येण्याची शक्यता आहे.

सध्या अटकेत असलेल्या प्रवाशाची मानसिक स्थिती, हेतू आणि पार्श्वभूमी याचा तपास सुरू असून त्याच्यावर देशद्रोहासह गंभीर गुन्ह्यांखाली कारवाई होण्याची शक्यता आहे.

FAQs

  1. What caused the emergency landing of the EasyJet flight?
    इझीजेट विमानाच्या प्रवाशाने बॉम्ब असल्याची धमकी दिल्यामुळे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

  2. Was the passenger arrested after the bomb threat?
    होय, धमकी दिल्यानंतर संबंधित प्रवाशाला ताबडतोब अटक करण्यात आली.

  3. Did any passengers get injured during the incident?
    नाही, या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.

  4. Where did the emergency landing take place?
    हे विमान ग्लासगो विमानतळावर आपत्कालीन उतरण्यात आले.

  5. Are such incidents increasing recently?
    होय, सध्या अशा प्रकारच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com