Viral Video : अरे दिदी! स्टँड वर न करताच पळवत होती गाडी; मुलाने सांगितलं पण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

Viral Video : अरे दिदी! स्टँड वर न करताच पळवत होती गाडी; मुलाने सांगितलं पण...

अनेक वेळा सोशल मीडियावर विनोदी व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यामध्ये मुलींचेही व्हिडिओ असतात. मुलीच्या डान्सचे किंवा गाडी चालवताना झालेल्या अपघाताचे व्हिडिओ सोशळ मीडियावर व्हायरल होत असतात. तर सध्या दोन मुलींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्या स्टँड वर न करताच गाडी चालवताना दिसत आहेत.

हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन तरूणी स्कूटीवर बसून प्रवास करताना दिसत आहेत. तर एक मुलगा गाडीवरून जात असताना त्यांनी स्टँड वर करायला सांगतो. गाडीचं स्टँड वर करायचं सोडून गाडीवरील मुलगी उभा राहते. त्यामुळे त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, या मुलींना सोशल मीडियावरील युजर्सने ट्रोल केलं असून इंस्टाग्राम, युट्यूब आणि फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे. हा व्यक्ती त्यांना मदत करायला गेला अन् पोरगी उभा राहिली त्यामुळे त्या मुलीवर टीकेचा वर्षाव होत आहे. पण तरूण तरूणींनी गाडी चालवताना स्टँड वर केले आहे की नाही ते एकदा तपासून पाहावे.

टॅग्स :young girlviral video