Video Viral
Video ViralSakal

Video Viral : विद्यापीठात आलेल्या 2 कोरियन तरूणींची छेडछाड; धर्मांतराचा आरोप

ख्रिस्ती मिशनकडून या ठिकाणी धर्माचा प्रसार करण्यात येत असल्याचा आरोप या तरूणांनी केला आहे.

लखनऊ : उत्तरप्रदेशातील मेरठ येथील चौधरी चरण सिंग विद्यापीठात भेट देण्यासाठी आलेल्या दोन कोरियन तरूणींची छेड काढण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. हिंदुत्ववादी तरूणांकडून या तरूणींना छेडण्याच आल्याचा आरोप असून या घटनेचा व्हिडिओ सदर तरूणांनी शूट केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशळ मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही तरूण या तरूणींना 'इथे येण्याचं कारण काय आहे? तुमच्यासोबत कोण आहे?' असं विचारताना दिसत आहेत. तर त्यानंतर 'हे ख्रिश्चन मिशन आहेत... पण इथे फक्त एकच देव आहे, तो राम आहे.' असं एकजण बोलताना या व्हिडिओमध्ये ऐकायला येत आहे.

तर जय श्रीरामच्या घोषणा काही तरूणांकडून देण्यात येत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. कोरियाच्या भारतीय दूतावासाकडून या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अनोळखी तरूणांवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास चालू असल्याची माहिती आहे.

दरम्यान, तरूणांकडून या तरूणी एखाद्या धर्माचा प्रसार करत असल्यासारखं व्हिडिओत दाखवलं आहे. मात्र यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com